गर्जती नाचती आनंदे डोलती ...
गर्जती नाचती आनंदे डोलती । सप्रेम फुंदती विठ्ठल नामें ॥१॥
तया सुखाचा पार न कळे ब्रह्मांदिका । पुंडालिकें देखा भुलविले ॥२॥
नावडे वैकुंठ नावडे भुषण । नावडे आसन वसन कांही ॥३॥
कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥