Get it on Google Play
Download on the App Store

आत्याच्या घरी 4

ती श्रीमंत बाई उठली. प्रेमाला काहीतरी दु:ख आहे हे तिच्या लक्षात आले. ती प्रेमाच्या पेटीजवळ गेली. तिने ती पेटी उघडली. त्यात पत्रे होती. रामरावांची पत्रे. एक फोटो होता. प्रेमाच्या लग्नाच्या वेळचा फोटो. ती बाई चमकली.

‘हा माझा भाऊ रामराव. मग ही प्रेमा कोण? तीच का काय? होय. तीच. माझ्या भावाची मुलगी. ती ही प्रेमा!’

ती श्रीमंत बाई तेथे बसली होती, तो प्रेमा आली.

‘प्रेमा, मी तुझी आत्या आहे, आत्या.’

‘होय आत्या, तू माझी आत्या.’

प्रेमाने आत्याच्या गळ्याला मिठी मारली. तिला अश्रू आवरत ना.

‘आत्या, तू दवाखान्यात आफ्रिकेतील गोष्टी सांगितल्यास, तेव्हाच मी ओळखले की तू माझी आत्या म्हणून. त्या वेळेस माझ्या डोळ्यांत पाणी आले होते.’

‘तेव्हाच तू का नाही सांगितलेस? मला तुझ्याविषयी काहीतरी वाटे. तुझ्याकडे माझे आतडे ओढ घेई. प्रेमा, भाऊ नाही भेटला पण त्याची मुलगी तरी भेटली. माझ्या पैशांची तू मालकीण हो. देवानेच जणू तुला माझ्याकडे पाठविले.’

‘आत्या, देव आहे ना?’

‘हो. देव आहे. तुझी माझी भेट घडवणारा कोणी तरी आहे. ये. बस जवळ. ये. खरेच तू माझी आहेस प्रेमा! आणि तुझ्या पतीचे काय झाले? कोठे आहे तो?’

‘त्यांनी माझा त्याग केला आहे. त्यांना पैसे हवेत. मी नको.’

‘मग आता आहेत भरपूर पैसे, बोलव त्यांना.’

‘नको आत्या, या पैशांचा चांगला उपयोग करू. एखादी संस्था काढू. एखादा गरीब लोकांसाठी दवाखाना काढू. लहानपणी माझ्या मनात येई की डॉक्टर व्हावे. मिशनरींप्रमाणे कोठे दवाखाना घालावा. ती माझी इच्छा पूर्ण होईल.

‘तू का अशीच राहाणार?’

‘आता सेवा हाच आनंद.’

‘परंतु पती निवळेल. पती असून असे नये राहू. पैशाची अडचण आता नाही.’

‘आत्या, त्यांना कितीही पैसे मिळाले तरी पुरे होणार नाहीत; कुबेराला ते भिकेस लावतील. त्यांना पश्चात्ताप  होईल असे वाटत नाही.’

‘प्रेमा, होतो हो माणसाला पश्चात्ताप. केव्हा तरी होतोच. मरताना तरी होतो.’

‘आत्या, सध्या नको ती चर्चा. तू मला भेटलीस. बाबा कोठे गेले देवास माहीत! परंतु तू मला भेटलीस. तू मला थोपट. तुझ्या मांडीवर डोके ठेवू?’

प्रेमाने आत्याच्या मांडीवर डोके ठेवले. आत्या थोपटीत बसली. आत्येचे सुप्त मातृप्रेम जागे झाले. प्रेमाची ती जणू आई बनली.

बेबी सरोजा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
रामराव 1 रामराव 2 रामराव 3 सत्यनारायण 1 सत्यनारायण 2 सत्यनारायण 3 सत्यनारायण 4 प्रेमाचे लग्न 1 प्रेमाचे लग्न 2 प्रेमाचे लग्न 3 प्रेमाचे लग्न 4 पित्याची शेवटची देणगी 1 पित्याची शेवटची देणगी 2 पित्याची शेवटची देणगी 3 पित्याची शेवटची देणगी 4 ना सासर ना माहेर 1 ना सासर ना माहेर 2 ना सासर ना माहेर 3 ना सासर ना माहेर 4 मुलीचा त्याग 1 मुलीचा त्याग 2 आत्याच्या घरी 1 आत्याच्या घरी 2 आत्याच्या घरी 3 आत्याच्या घरी 4 आत्याचे निधन 1 आत्याचे निधन 2 आत्याचे निधन 3 आत्याचे निधन 4 मुलीची आकस्मिक भेट 1 मुलीची आकस्मिक भेट 2 मुलीची आकस्मिक भेट 3 पतीच्या मदतीस 1 पतीच्या मदतीस 2 पतीच्या मदतीस 3 पतीच्या मदतीस 4 सत्याग्रहात 1 सत्याग्रहात 2 सत्याग्रहात 3 सत्याग्रहात 4 हरिजन यात्रा 1 हरिजन यात्रा 2 हरिजन यात्रा 3 हरिजन यात्रा 4 आनंदी आनंद गडे 1