Android app on Google Play

 

सिंहांना दूर ठेवण्याची युक्ती

 


नसरुद्दिन आपल्या घराच्या बाहेर पोळ्यांचे तुकडे टाकत होता.

त्याला असे करताना पाहून एका शेजाऱ्याने विचारले - "हे काय करतोयस मुल्ला?"

"सिंहांना दूर ठेवण्याचा ही एक उत्कृष्ट पद्धत आहे." - मुल्ला म्हणाला.

"पण या भागात तर एकही सिंह नाही!" - शेजारी आश्चर्याने म्हणाला.

मुल्ला म्हणाला - "पद्धत एकदम उपयुक्त आहे, नाही का?"