Android app on Google Play

 

भांडे

 

त्याच सायंकाळी मुल्ला स्वयंपाक घरात काहीतात्री बनवत होता. तो आपल्या शेजाऱ्याकडे गेला आणि त्याच्याकडे एक भांडे मागितले आणि शब्द दिला की पुढच्या सकाळी तो भांडे परत करेल.

पुढच्या सकाळी मुल्ला शेजाऱ्याकडे भांडे परत करण्यासाठी गेला. शेजाऱ्याने मुल्लाकडून आपले भांडे घेतले आणि पाहिले की त्या भांड्याच्या आत तसेच छोट्या आकाराचे भांडे ठेवलेले होते. शेजाऱ्याने मुल्लाला विचारले, "मुल्ला! हे छोटे भांडे कशासाठी?" मुल्ला म्हणाला, "तुझ्या भांड्याने रात्री या बाळाला जन्म दिला म्हणून मी तुला दोन्ही परत करत आहे."

शेजाऱ्याला हे ऐकून फार आनंद झाला आणि त्याने सोनही भांडी मुल्लाकडून घेतली. पुढच्याच दिवशी मुल्ला पुन्हा शेजाऱ्याकडे गेला आणि त्याच्याकडे आधीच्या भांड्यापेक्षा सुद्धा मोठे भांडे मागितले. शेजाऱ्याने आनंदाने त्याला मोठे भांडे दिले आणि पुढच्या दिवसाची वाट पाहत तो बसला.

एक आठवडा झाला तरीही मुल्ला काही भांडे परत करण्यासाठी आला नाही. एकदा बाजारात खरेदी करण्यासाठी गेले असता मुल्ला आणि तो शेजारी यांची समोरासमोर धडक झाली. शेजाऱ्याने मुल्लाला विचारले, "मुल्ला! माझे भांडे कुठे आहे?" मुल्ला म्हणाला, "ते तर वारले!" शेजारी हैराण झाला. त्याने विचारले, "असे कसे होईल? भांडी कधी मारतात का?" यावर मुल्ला म्हणाला, "का बाबा? जर भांडी जन्म देऊ शकतात तर मारू का शकत नाहीत?"