Android app on Google Play

 

मुल्ला आणि चोर

 

मुल्ला आपल्या शागीर्दांसह एका रात्री आपल्या घरी येत होता. तेवढ्यात त्याने पाहिले की एका घराच्या समोर काही चोर उभे आहेत आणि कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुल्लाला वाटले की अशा वेळी काही बोलणे धोकादायक ठरू शकेल म्हणून तो गपचूप चालत राहिला. मुलाच्या शागीर्दांनी सुद्धा ते दृश्य पाहिले होते. त्याच्यातील एकाने मुल्लाला विचारले - "ते लोक तिथे दरवाजाच्या समोर काय करत आहेत?"

"श्श्श्श..." मुल्ला म्हणाला "ते सतार वाजवत आहेत..."

"परंतु मला तर कोणतेही संगीत ऐकू येत नाहीये.." शागीर्द म्हणाला.

"ते उद्या सकाळी ऐकू येईल..." मुलाने उत्तर दिले.