Get it on Google Play
Download on the App Store

लग्न

एक दिवस मुल्ला आणि त्याचा एक मित्र उपहारगृहात बसून चहा पीत होते आणि जग आणि प्रेम यावर गप्पा मारत होते. मित्राने मुल्लाला विचारले, "मुल्ला! तुझे लग्न कसे झाले?"

मुल्ला म्हणाला, "मित्रा, मी तुझ्याशी काही खोटे बोलणार नाही. मी माझे तारुण्य सर्वांत चांगली स्त्री शोधण्यात घालवली. इजिप्त मध्ये मी एका सुंदर आणि बुद्धिमान स्त्रीला भेटलो, जिचे डोळे डोहाप्रमाणे खोल होते परंतु ती मनाची साफ नव्हती. नंतर बगदाद मध्ये सुद्धा मी एका स्त्रीला भेटलो जी अतिशय मोठ्या मनाची आणि सच्ची होती, पण आमच्या आवडी निवडी एकदम भिन्न होत्या. एकामागोमाग एक, अशा कितीतरी स्त्रियांना मी भेटलो परंतु प्रत्येकीत काही ना काही कमतरता होतीच.. आणि मग एक दिवस मला ती भेटली जिचा शोध मी घेत होतो. ती सुंदर होती, बुद्धिमान होती, मनाने चांगली होती आणि सच्ची पण होती. आमच्या दोघांच्या बऱ्याच गोष्टी जुळत होत्या. मी तर म्हणेन की ती पूर्ण सृष्टीत माझ्याचसाठी बनलेली होती..." मित्राने मुल्लाला थांबवत मधेच विचारले, "अच्छा! मग काय झाले? तू तिच्याशी लग्न केलेस!"

मुलाने विचारात हरवून जाऊन चहाचा एक घुटका घेतला आणि म्हणालं "नाही मित्रा! ती जगातील सर्वांत चागल्या पुरुषाच्या शोधात होती!"