Android app on Google Play

 

दुसरा प्रश्न

 

एकदा मुल्लाला वाटले की लोक फुकटात त्याच्याकडून सल्ले, युक्त्या घेऊन जातात, म्हणून त्याने आपल्या घराच्या समोर जाहिरात लावली, "प्रश्नांची उत्तरे मिळावा. कोणत्याही प्रकारच्या दोन प्रश्नांची उत्तरे केवळ १०० दिनारांमध्ये."

एक माणूस मुलाकडे आला आणि मुलाच्या हातात १०० दिनार देत त्याने विचारले - "दोन प्रश्नांसाठी १०० दिनार जास्त होत नाहीत?"

"नाही." - मुल्ला म्हणाला - "तुमचा दुसरा प्रश्न काय आहे?"