Android app on Google Play

 

किस्सा सातवा

 

अर्ध्या रात्री घराच्या बाहेर दोन व्यक्तींच्या भांडण्याच्या आवाजाने मुल्लाची झोपमोड झाली. काही वेळपर्यंत मुल्ला वाट पाहत राहिला की त्यांचे भांडण संपेल आणि मग आपण पुन्हा झोपू, पण भांडण चालूच राहिले.

कडाक्याची थंडी पडलेली होती. मुल्ला आपले डोके आणि शरीर रजईत गुंडाळून बाहेर आला. त्याने त्या दोघा भांडणाऱ्या व्यक्तींना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. पण आता तर ते दोघे हाणामारीवर उतरत होते.

मुल्लाने जेव्हा त्या दोघांना न भांडण्याची समाज दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाने अचानक मुलाची रजई हिसकावून घेतली आणि त्या दोनही व्यक्ती पळून गेल्या.

झोपेने जडावलेला आणि थकलेला मुल्ला घरात येऊन अंथरुणात धडामकन पडला. मुल्लाच्या पत्नीने विचारले, "बाहेर भांडण कशासाठी चालू होते?"

"रजईसाठी.." मुल्ला म्हणाला - " रजई गेली आणि भांडण संपले."