Android app on Google Play

 

प्रिय वस्तू

 

एक दिवस मुल्ला बाजारात गेला आणि त्याने एक जाहिरात लावली ज्यावर लिहिले होते, "ज्याने कोणी माझे गाढव चोरले आहे त्याने ते मला परत करावे. मी त्याला ते गाढव बक्षीस म्हणून देईन."

"नसरुद्दिन!" - जाहिरात वाचून लोक म्हणाले - "या गोष्टीला काय अर्थ आहे? तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का?"

"जगात दोनच प्रकारचे उपहार सर्वांत चांगले असतात.." मुल्ला म्हणाला - "पहिला म्हणजे आपली हरवलेली प्रिय वस्तू परत मिळणे आणि दुसरी म्हणजे आपली प्रिय वस्तूच कोणाला तरी देणे..."