लक्षात ठेवा, तुमच्या मनात येणारे विचार आणि उठणारे आवाज नेहमी सगळे खरे नसतात
आपल्या सगळ्यांच्या मनात दिवसभरात असे अगणित विचार, आवाज येतात, जे आपल्याला दररोज सांगतात की आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये, तसेच काय सत्य आहे आणि काय असत्य. आई - वडील, पती - पत्नी, भाऊ - बहीण, मित्र, साथीदार, सोबती, शत्रू आणि समाज, सगळे तेच आहेत. काही वेळा ते आपल्या भल्यासाठी असतात तर काही वेळा नसतात. लक्षात ठेवा, तुम्ही विचार बंद कधीच करू शकत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे. जे आवाज तुम्हाला आनंदाकडे घेऊन जातात त्याचं ऐका, आणि बाकी सर्वांकडे दुर्लक्ष करा.