Get it on Google Play
Download on the App Store

निस्सीम प्रेम...!!

अनंत चतुर्दशी गणरायांचे विसर्जन  अनंत चतुर्दशी ही तिथी आहे भगवान श्रीविष्णूंची. अनंत म्हणजे त्याचा कधीही अंत होत नाही असा आणि जो संपूर्ण विश्वात सामावलेला आहे. अशा भगवान विष्णू यांची ही तिथी.

भगवान गणेश हे भगवान विष्णूंचाच अवतार असून मानवाच्या आणि त्रिभुवनाच्या कल्याणासाठी त्यांनी माता पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेतला तो दिवस गणेश चतुर्थीचा. तर भगवान विष्णूंच्या अनंत व्रताचा समारोप अनंत चतुर्दशीला होतो. त्याच मुहूर्तावर भगवान विष्णूंचा अवतार असलेले गजानन पृथ्वीवरून पुन्हा स्वर्गात परतात.

याच श्रीकृष्णाने प्रेम म्हणजे त्याग हेही शिकवले चौस ष्ट कलां चा अधिष्टाता गणपती बाप्पा ही प्रेम सौन्दर्यचे प्रतीक प्रेम ही जाणीव भावना यातूनच जन्म घेते  अशा प्रेमाची काय परिभाषा हे थोडे वेगळे मांडावे का या विसर्जनाचे निमित्त म्हणून निस्सीम प्रेम..राधा श्रीकृष्ण..चे


स्नेह प्रेम आदर एकरूपता हे सगळे प्रेम व्यक्त करण्याचे प्रकार वेगवेगळ्या संदर्भात भावना तिच.. प्रेम उत्कट असावं. असे रूढ.प्रेम प्रग ल्भ हवे.. आजकाल जे बघतो ते संदर्भ चुकीचेच सोयेनुसार व्या ख्या व्यक्तीनुसार बदलत जाणाऱ्या दिसतात.

अपरिपक्व 
 प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.तर 
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज असेच काहीसे पण आजकाल प्रेम ही सोय म्हणून.....

असो कालाय तस्मै नमः!. मग आठवली 
महाभारतातील एक गोष्ट श्री कृष्ण आणि राधा यांची आठवली ज्यात प्रेम म्हणजे त्याग हे अधोरेखित...!!

 सृष्टीचा कर्ता-धर्ता अशीच ओळख आहे कृष्णाची!

देवाधीदेव विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे अनेक अवतार आहेत. समयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगामध्ये त्यांनी वेगवेगळ्या अवतारात जन्म घेतला. कलियुगातला गणेशाचा ध्रुमवर्ण  हा अवतार होणे आहे..

या पैकी त्यांचे जेवढे मर्त्य अवतार (मानवी अवतार) आहेत त्यामध्ये कधीच त्यांची प्रेमकथा पूर्ण झाली नाही. जसे की, राम आणि सीता किंवा भगवान श्रीकृष्ण आणि राधा.

असे म्हणतात की, श्रीकृष्णाला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा केवळ दोन गोष्टी खूप प्रिय होत्या आणि त्या त्यांच्या मनाशी खोलवर जोडल्या होत्या. त्या दोन गोष्टी म्हणजे- राधा आणि त्यांची प्राणप्रिय बासरी!

जरी श्रीकृष्णाने राधेशी लग्न केले नव्हते तरीसुद्धा त्यांच्या ८ प्रमुख बायका आणि १६००० सख्यांपेक्षा सर्वात जास्त प्रेम ते राधेवरच करीत असत. असे निस्सीम प्रेम आढळणे कठीण!

ही गोष्ट फारशी कोणाला माहित नसेल, पण हे खरे आहे की, राधेचा ही विवाह झाला होता. जेव्हा राधेने एका सामान्य यादव कुळातील तरुणाशी विवाह केला, तेव्हा श्रीकृष्णाने वृंदावन सोडून मथुरेला परत येण्याचा निर्णय घेतला.

श्रीकृष्णाला कळून चुकले होते की आता राधा कधीच त्यांची होऊ शकणार नाही, म्हणून ते तिच्या आठवणीमध्ये सतत आपली प्रिय बासरी वाजवत बसत असत.

एकीकडे राधा पत्नी म्हणून आपल्या संसारिक जबाबदाऱ्या संभाळत होती आणि दुसरीकडे श्रीकृष्ण आपल्या दैवी जबाबदाऱ्यांची पूर्तता करत होते.

श्रीकृष्णाच्या बासरीमधून निर्माण होणाऱ्या मंजुळ संगीताने राधा कृष्णावर मोहित झाली होती आणि त्यामुळेच ते एकत्र आले होते. ह्याच कारणामुळे श्रीकृष्ण राधे एवढेच आपल्या बासरीवर देखील प्रेम करत असत.

जरी कृष्ण आणि राधा काही परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर असतील, तरी ती बासरी नेहमी त्यांच्या मधील दुवा साधायची. त्या बासरीमधून असे काही मंत्रमुग्ध करणारे
 गोड संगीत बाहेर पडत असे जे थेट राधे पर्यंत पोचत असे आपली सगळी कर्तव्ये पार पाडल्यानंतर, शारीरिकदृष्ट्या वृद्ध झालेल्या राधेला आपल्या आवडत्या श्रीकृष्णाची शेवटची भेट घायची होती आणि ज्या बासरीने दोघांना अजूनही जोडून ठेवले होते, त्या बासरीचे, मंत्रमुग्ध करणारे संगीत ऐकायचे होते.

राधा जेव्हा द्वारकेला पोहोचली, तेव्हा तिला कळले की रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यासोबत कृष्णाचा विवाह झाला आहे. पण ती निराश झाली नाही, कारण तसा लोभ कधीही तिच्या मनात नव्हता.

कृष्णाने देखील आपल्या अंतर्मनातून राधा आपल्या भेटीसाठी येत आहे हे जाणले होते. दोघांची भेट झाली आणि राधेने एक दासी म्हणून श्रीकृष्णाच्या पदरी राहून त्याची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली

एकदा आपली शेवटची इच्छा म्हणून राधेने आपल्या प्रेमाचे प्रतिक असलेली बासरी श्रीकृष्णाला वाजवायला सांगितली. ते मधूर संगीत ऐकून पुन्हा राधा आपले भान हरपली. श्रीकृष्णाचे अजूनही आपल्यावर पूर्वी इतकेच प्रेम आहे हे पाहून राधा कृतार्थ झाली.

त्या दिव्य बासरीमध्ये अशी काही शक्ती होती की, कितीही आवरले तरी श्रीकृष्णाकडे राधेचे मन पुनश्च धाव घेत होते.

राधेची शेवटची इच्छा म्हणून कृष्ण राधेसाठी रात्रंदिवस न थांबता बासरी वाजवू लागला. श्रीकृष्णाच्या बासरीमधून तोवर सूर निघत होते, जोवर राधा आपला देह त्यागून श्रीकृष्णात विलीन झाली नाही.

त्यानंतर दुसऱ्याच क्षणी श्रीकृष्णाने आपली प्राणप्रिय बासरी आपल्या प्राणप्रिय सखेच्या विरहाने तोडून फेकून दिली. त्यानंतर त्यांनीही संपूर्ण आयुष्यात आपले अवतार कार्य संपेपर्यंत बासरी किंवा दुसरे कोणतेच वाद्य वाजवले नाही.

असा झाला राधा-कृष्णाची निस्सीम प्रेम कथेचा अंत.. ही 
गोष्ट सर्वं परिचित प्रेमाचे वर्णन आपल्या पुराणकाळापासून
आपण सर्व माणूस अनुकरण प्रिय हे ही सर्व मान्य असेच दाखले घेत आताचे जगणे सुकर करतो हे ही सर्वमान्य
हा संदर्भ सहजच मनात आला तो अजूनच प्रेम संकल्पनेला परिपक्व करतो नाही का?

तुम्हाला काय वाटत? आजकाल पुन्हा अशा उदा. हरणाची संथा हवी का?

प्रेम ही कधी ही कुठेही कुणावरही होऊ शकत असलं तरी त्यालाही मर्यादा जी आपणच आखून घ्यायला हवी नाही का?

यासाठी मागे मी बोलले निवड आणि निर्णय ते या बाबतीत ही लागू पडू शकतेच.. प्रतिकूल तेला अनुकूलतेत बदलण्याची गरज असते त्यासाठी गरज संयम.. किंवा प्रथमच विचारपूर्वकता हवी अन्यथा जबाबदारी स्वतःच स्वतः वर.. असे अनेक पैलू प्रेम...याविषयी.. ते निभावताही यायला हवेच. तक्रार करत ही  तडजोडीत ही संवेदना जपता आली तरच ते निस्सीम प्रेम..!!

व्यक्तीनुसार  सद्यपरिस्थिती नुसार बदलणारे संदर्भ आदर..

तरी जोडणे जास्त श्रेयस्कर... संवाद संयम.. तडजोड.. जिद्द.. ह्याची पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज वाटते??

©मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!