Get it on Google Play
Download on the App Store

स्वतंत्रते भगवती

...वीर विनायक सावरकर २८मे जयंतीचे निमित्ताने ..

"विनायक दामोदर सावरकर " बुद्धिवादी हिंदुत्वावादी म्हणूनआपली ओळख 28मे 1883 मधे भगूर" दारणा नदीकाठचा भाग . धर्मनिष्ठ मातोश्री  राधाबाई  वडील दामोदरपंत यांच्या पोटी सावरकरांचा जन्म झाला.

सावरकर नऊ वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रींना महामारीचे झाले. सावरकर मातृभक्त होते."आई,  आता कुणा म्हणू मी ?!"असे म्हणत ते रडू लागले तेव्हा आईने त्यांना समजावले तात्या ,आता तुझी आई ती आहे तिची सेवा कर."सावरकरांना त्यांच्या मातोश्री तात्या म्हणत.असे म्हणत त्यांच्या आईने देव्हा-यातील पितळी मूर्तीकडे बोट दाखवत सांगितले,."या मूर्ती ला आई मानून तिची सेवा कर."ती मूर्ती अष्टभुजा दुर्गा होती..नवरात्रात या देवीची आराधना पूजा होत असे ...पुढे त्यांच्या मातोश्री देवाघरी गेल्या . पुढे आपल्या मोठ्या वहिनी येसुवहिनी यांच्या पायाशी सावरकरांना आपल्या आईची पावले दिसू लागली त्यांनी आपल्या वहिनीला मातेचे स्थान दिले.मातेच्या मायेने येसूवहिनींनी विनायक व नारायण या आपल्या दोन दीरांना सांभाळले.

सावरकर सोळा वर्षाचे असताना चाफेकर बंधू ....तेव्हा स्मरण झाले त्या  देवघरातील महिषासूरमर्दिनीचे व आपल्या आईचे   देव्हा-या समोर उभे राहून ते म्हणाले, आई,महिषासूरमर्दिनी तू माझी आई आहेस मला आशिर्वाद दे तेव्हा त्यांना त्या मूर्तीच्या रुपात भारतमाता दिसू लागली त्याचक्षणी सावरकरांनी स्वातंत्र्याची शपथ घेतली .

पुढे ५० वर्षे काळे पाणी ही शिक्षा व अंदमानात तेलाच्या घाण्याला जुंपले त्यामुळे झालेले हाल त्यांनी सोसले पण आपला क्षात्रधर्म त्यांनी सोडला नाही त्या जेलमधेही त्यांनी भयंकर क्रुर वाटणाऱ्या वागणाऱ्या कैद्यांना माणसात आणण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले.

१९३७ झाली त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे मुंबई येथील अध्यक्षपद भूषविलेत्यावेळच्या आपल्या भाषणात
त्यांनी लष्करीकरणाचा प्रचार केला.

विनायक दामोदर सावरकर हे उत्तम साहित्यिक ही होते.साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांनी कर्तुत्व गाजवले.अनेक लेख लिहले आपल्या अमोघ वाणीने समाजक्रांतीची शिकवण दिली.

"माझी जन्मठेप" हे त्यांच्या त्यागी जीवनाचे खरे द्योतक आहे.तर "काळे पाणी"ने मानवी भावनांचे वास्तव दर्शविले तर "संन्यस्थखड्गं " सारखी नाटके राष्ट्रकल्याणाचा नकळत जयघोष करतात.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची शताब्दी १९५७मधे साजरी होताना  त्याचे अध्यक्ष पदही सावरकरांनी भूषविले.

आईने दिलेली आज्ञा शिरसावंद मानून देवघरातील त्या महिषासूरमर्दिनीच्या रुपात त्यांना भारतमाता दिसली अन् भारतमातेला विनायक दामोदर सावरकरांच्या रुपात तेजपुंज वीर सुपुत्र लाभला.

स्वातंत्र्यानंतरही अनेक परकीय आक्रमणांना तोंड देत भारतीय जवानांनी पराक्रम केले अन् हे ऐकून सावरकर देव्हा-यातील त्या पराक्रमदेवतेची महिषासूरमर्दिनीचे आशिर्वाद घेण्यास उभे राहिले नकळत त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले विजयाची साक्ष देणारे अन् जन्म झाला "स्वतंत्रते भगवती" या गीताचा ...

" जयोस्तुते जयोस्तुते श्री मह्नमंगले
   शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति......""

सावरकरांना घडवणारी माता त्यांच्या बालपणीच गेली असली तरी तिने त्यांना त्या दुर्गेच्या सुपूर्त केले.महान ती माता वंदनीय.असा भारावून टाकणारे वीर घडले विनायक ते वीर विनायक दामोदर सावरकर आष्टपैलू व्यक्तीमत्व ज्यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातेचा अविभाज्य भाग होता.

आपल्या भारतदेशाला मातेचा दर्जा देणारे प्रेरित होणारे वीर अजूनही होतील आहेत फक्त प्रेरणा हवी. ती सावरकरांच्या साहित्यात नक्कीच निर्माण करेल हवा फक्त विचार......!!

©मधुरा धायगुडे
28/05/2021

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!