Get it on Google Play
Download on the App Store

ध्यान (Meditation)

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती टिकवून ठेवते .

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो

सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने  येते. ध्यान करून आपल्याला भरपूर उर्जा व  विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर..दिवसातून पंधरा मिनीटे तरी.......

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेली ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटु शकतील

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते.तर ध्यानामुळे जी ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी राहते

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात.

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.
म्हणून
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व  
ही खूप असावे आणि  या अशा आजच्या महामारी संकटात ते खूप जाणवते .ते.उपयुक्त ठरू शकेल का ?

कारण

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.
आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

ध्यान म्हणजे एक स्वतः स्वतः साठीच केलेली साधना आत्मबल वाढवून आत्मनिर्भर आत्मविश्वास निर्माण करणारी नकळत वातावरणाला सकारात्मक करणारी उर्जा.. शेवटी  वृत्ती त विचारात कृतीत बदल  होणं हीच खरी साधना ...अशा महामारीत स्वतः चे रक्षण स्वतः स्वयंशिस्तिने नियमाबरहुकुम राहून स्वतः केले तर संपूर्ण समाजातही नकळत बदल होतील...असेच वाटते ..

फार काही जमलं नाही तरी डोळे बंद करुन शांत बसणं क्षणभर हे ही पूरक ठरते .ध्यान स्वतः च्या श्वासावर ...स्वतः नियंत्रण संयम सकारात्मक विचारांची पायाभरणीच...!
जेवढे जसे सुचले  तेवढे मांडले ...व्यक्ती सापेक्षता आहेच .....

©मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!