Get it on Google Play
Download on the App Store

पाऊस

"पाऊस पहिला जणू कान्हूला बरसून गेला बरसून गेला" कवितेच्या सुंदर नक्षीदार ओळी जणूकाही शब्दातच पावसाचे सौंदर्य नकळत टिपून जातो. पाऊस एक निसर्ग देणगी, चराचरात भरून व्यापलेला परमेश्वरानी पसरून टाकलेलं एक चैतन्यच. पाऊस मनातला, पाऊस आठवणीतला, पाऊस नव्याची नवलाई, मनाची मोहकता दर्शवणारा केवळ एक शब्द पण व्यक्ती नुसार त्याचे संदर्भ बदलत जातात आणि एक कवि कल्पना होवून जातो हा पाऊस. मनातील चिरकाल टिकणारे एक सौंदर्य.

"येरे येरे पावसा" म्हणत आपण त्याला बोलावतो तर कधी कधी न बोलवता ही आपली चैतन्यरूपी बरसात करतोच ,कधी बीभत्सरूप ही धारण करणारा हा पाऊस आपले असणे जसे दाखवून देतो तसेच नसणे ही अवकाळीरूप दाखवतो आणि जगण्याचा अविभाज्य भाग म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.

"पाऊस" कवि मनाला बेधुंद करणारा मनाला चिंब भिजवणारा पहिला पाऊस तरुणाईला हवा हवासा वाटतो. पहिल्या पावसाच्या त्या चिंब आठवणी जगण्याची लय पकडून आयुष्याची वाटचाल करायला सुखद वाटतो. तो पहिला पाऊस तर नको ती रिपरिप असा वैताग आणणारा पाऊस कुणाला क्रोधीत करतो तर बालमनाला कागदाच्या त्या होड्या सोडत आनंदाची उधळण करत असतो. बालपणाच्या त्या आल्हाददायक आठवणी कोवळ्या मनाची शीतलता टिकवून ठेवतात. पाऊस एक सकारत्मक अनुभवाची शिदोरी जपून ठेवण्यासाठी मदत करतात. काहींना आपले बालपण तरुणपण आठवून देणारा पाऊस आनंद पसरवण्यास परावृत्त करतो तर वार्धक्यातही ह्या सगळ्या पहिल्या पाऊसाची जुळवाजुळव करण्याची एक सुखद वेदना पण एक छुपा आनंद देऊन जातो.

चरचरांत व्यापून राहिलेलं हे सौंदर्य विश्वाची उत्पत्ती लय दर्शवते. या स्थितिरुपतेचे अलौकिक दर्शन घडवत विश्वाला एक निसर्ग देणगी ती जपा असा संदेश देते. पाऊस हळुवार जपणारी, प्रत्येकाच्या मनात रुंजी घालणारी एक अवीट भावना जी केवळ नाजूक भावनाच प्रफुल्लित करते.

पण निसर्गातच विदित असलेल्या निसर्गाकडूनच निसर्गाकडे जाणाऱ्या या चक्राचे कुठेतरी भान आपल्याच कृतीमुळे मानव विसरत चाललाय का?मग वृक्षलागवड वृक्षारोपणसारखे उपक्रम मुद्दाम करण्याची वेळ आपणावर यावी का?कारण वृक्षाचे महत्व आपण अनादि काळानुसार जाणतो पौराणिक आधाराचे वर्णन आपल्याला उपनिषदात बघायला मिळते मग तुळस, बेल,वेड, पिंपळ या सारख्या असंख्य वृक्षाचे महत्व पुन्हा एकदा शालेय स्तरापासून समजून सांगण्याची वेळ आली आहे का?

नुसती वृक्षलागवड करून चालणार नाही तर तिचे संगोपन करणे गरजेचे हे सांगणे ही महत्वाचे, मुक्या प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींना सुद्धा सांभाळून वात्सल्य देणे महत्वाचे ठरते, मग वनस्पती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होवून जाईल पण हे सगळं शक्य "पाऊस" या एका संकल्पनेमुळे नव्हे वृक्षच हा पाऊस संकल्पनेचा मूलभूत आधार म्हणूनच तर ज्ञानेश्वर म्हणतात, "वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी" वनदेवतेचा आशिर्वाद म्हणजे पाऊस रुपी चैतन्य....

मग हे चैतन्य सगळीकडेच एकसारखी कृपा का करत नसेल?त्या त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार हा मूलभूत विचार असला तरी मानवात दिसणारी समानता या निसर्ग नियमाला खरतरं अपवाद नसावी पण मग तरीही विचारात सापेक्षता दिसतेच याला जबाबदार मानवच म्हणूयात का? निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाण्याचे धाडस मानव करू लागला निसर्गाचे अस्तित्वच कुठेतरी नाकारू लागला तर त्याची कृपा अवकृपा हा अध्यात्मिक विचार ही कुठेतरी करून बघायला हवा का?

बेधुंद मनाच्या आठवणी जागवणारा हा पाऊस हवा हवासा वाटेल अन "येरे येरे पावसा" म्हणत त्याला न बोलवतात कधी बरसून जाईल आपले चैतन्य पसरून जाईल हे कळणार नाही. मग बळीराजाचे राज्य यायला वेळ लागणार नाही, सुख समृद्धी घेवून नीत नव्याने दरवर्षी न चुकता बरसणारा हा पाऊस येतोच पण आपल्या मनातील जाणीव कुठेतरी त्याला थोपवत असतात अन फक्त नकारत्मक विचारच देवून न जाता सकारत्मक आठवणी त्याला पडण्याचे बळ निश्चितच देतील. मग अवकाळी परिस्थिती निर्माण करून तो त्याची अवकृपा न दर्शवता सर्व चराचरात भरून राहील व पाऊस एक समृद्ध अनुभव वाटेल.

पाऊस कसा हवा न नको या व्यक्ती सापेक्ष संकल्पना असल्या तरी त्याचे नसणे सगळ्यांनाच अनाकलनीय अवघड अनुभव देवून जाईल. पाऊस घडणारी, पडणारी एक चिरंतन आठवण.पाऊस रुंजी घालणारा मनाला मोहवून टाकणारा एक गरजेचा अविभाज्य भाग असेच म्हणूयात.पाऊस अनेक मानवी मनाच्या संकल्पनाची नांदीच जी मानवाच्या आदीपासून अंतापर्यंत पाऊस एक सत्य......!

© मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!