Get it on Google Play
Download on the App Store

रेशीमगाठ

"ऋणानुबंधाच्या चुकुन पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी"

गाण्याचे सूर कानावर पडताच आठवला नवीन विषय ....लग्नाच्या गाठी ब्रम्हदेव  बांधतो असे म्हणतात....विवाह संस्थेचा इतिहास आपल्या उत्क्रांती इतकाच प्राचीन ..विवाह धार्मिक अधिष्ठान असलेला कायदेशीर करार ज्ञानेश्वरांनी यालाच विधीच्या मांडवावर चढलेल्या कामवल्लीची उपमा दिली पूर्वी विवाह ही संकल्पना अतिशय सोपी होती बदलत्या स्त्रीपुरुष समानतेच्या काळात ती बदलत गेली संदर्भ बदलले उद्देश तोच ....

विवाह करताना जोडीदार निवडताना त्यातून येणारी मानसिकता धोके याचा ही विचार सकारात्मक व्हायला हवा एकमेकांचे रोष तत्वे  याची देवाणघेवाण सकारात्मक हवी ......

मुलगा मुलीच्या व्यक्तीमत्वात स्वतः ला आदर्श वाटणारी प्रतिमा बघत असतो म्हणजे ही विचारांची देवाणघेवाण सत्य परिस्थितीवर असेल तर फसगत होत नाही ...पण प्रेम विवाहात मुले वास्तवाला सोडून नसलेले गुण आपल्या जोडीदारात पाहतात निवडताना काळजी घेणे क्रमप्राप्त .केवळ मुलगा मुलगी पाहिली कि लग्न झाले असे न करता एकमेकांनी आपल्या गुणदोषांची अपेक्षा ची चर्चा करायला हवीच या सुंदर आयुष्याकडून आपल्या ला काय मिळवायचेय करिअर ,पैसा, कि शांत जीवन त्यानुसार जोडीदाराची निवड केली तर जीवन रम्य होईल दोन्हीही कडील कौटुंबिक पार्श्वभूमी भिन्न असेल तरी विवाहात समस्या येतील पण सामंज्यसाने दूर होतील कुटुंबातील व्यक्ती किनाऱ्यावरुन बघणारे असतात पोहायचे या दोघांना असते ...केवळ जोडीदार देखणा सुंदर म्हणून निवड न करता योग्य मूल्यमापन केले तर विवाह जीवनाची शांत लकेर वाटेल ...

निवड करताना आर्थिक स्थितीही पाहणे गरजेचे केवळ चांगला नवरा  किंवा बायको  मिळाली कि संसार झाला असे म्हणता येणार नाही तो टिकवून ठेवण्यासाठी ही प्रयत्न हवा दोघांनीहीही एकमेकांचे व्यक्ती मत्व खुलण्यास मदत करायला हवी आदर करायला हवा लय ओळखता यायला हवी ..
जोडीदाराची वागणूक खटकत असेल तरी मोकळेपणाने बोलता यायला हवे चांगल्या गोष्टीचे तोंडभरुन कौतुकही करता यायला हवेच...

अतिसमर्पित उत्कट नातं पती पत्नीचं असतं  सतारीच्या तारा दूर राहूनच छेडल्या जातात तसे हे परस्परपूरक ...एकमेकांचे स्वतंत्र व्यक्ती मत्व जपणारे असावे ...नाहीतर
पाडगावकरांच्या त्या कवितेतील ओळी ..

"आलो इतके जवळजवळ कि जवळपणाचे झाले ओझे "
असे होईल...

विवाहाचा विचार करताना सासू-सून संबधाचा विचार केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही केवळ गैरसमजूतीमुळे या नात्यातील नकारात्मकता  समोर येते अनंतकाळ साथ देणारी पत्नी कि जन्मदात्री यात संभ्रमता येते ...पत्नीने हे ही समजून घ्यायला हवे तर पतीने  आई व पत्नी यांच्यात तुलना करणे टाळले तर ..नवीन लग्न करुन आलेली मुलगी लगेच आपल्या आईवडीलांवर प्रेम करेल अशी अपेक्षा नसावी पण पत्नी ने ही कालांतराने मुरायला हवेच समजून घ्यायला हवेच  त्यात तिला एकत्र कुटुंब असेल तर इतरांनीही साथ द्यायला हवी ..यात तिच्या चसारख्या दुसऱ्या घरातून आलेल्यांनी सामावून घ्यायला हवं  ...पण आता सगळेच संदर्भ बदलले विभक्त कुटुंब पद्धती मुळे   सासूसासरे हे दडपण आता राहिले नसेल काळानुसार ....!

या सगळ्या चा योग्य विचार केला गेला तर विवाहोत्त् र  अवस्था " घटस्फोट " याची वेळ येणार नाही आपण त्याचा विचारच करु नकोयात ....!!

"लग्न एक  संस्कार" आजकालच्या पिढीला त्याची गहनता गांभीर्य समजत असेल ही पण तरीही...प्रत्येक गोष्टी ची एक वेळ असते त्यातील नावीन्य टिकून ठेवता यायला हवं असा काहीसा वेगळा विचार सद्यपरिस्थित देणं गरजेचच असावं..का?...

प्रत्येक नातं हे आपापले संस्कार संस्कृती घेवून जन्माला येतं प्रत्येक नात्याची गरज कर्तव्य वेगवेगळी सुनियोजित समयी ती ती समोर येत राहतातच यायला हवीच ...योग्य निवड कृती जाणीवा याचा समतोल साधण्याची संधी मिळत राहतेच.सर्व नात्याचा अनुभव देणारी ही रेशीमगाठ ...समतोलता शिकवणारी.....

ब-याचवेळा पुरुषांना पत्नीच्या आयुष्य भराच्या  कष्टाचे चीज तिच्या जाण्याने कळते मात्र पत्नीला बायकोपेक्षा आपली प्रेयसी मानणारा  शाहजानसारखा एखाद्या च तिच्यासाठी चिरंतन कलाकृती साकारणारा विरळाच.....ताजमहाल ही या  अमरप्रीतीची अजरामर कलाकृती .!!..

"विवाह "किती सुंदर मोहक संकल्पना त्याच्या परिसीमा काळानुसार जरी बदलत असल्या तरी मुख्य उद्देश एकमेकांच्या साथीने एकमेकांचे आयुष्य फुलवत जाणं आपली कर्तव्य ही महत्वाची मानत..जगण्याचा गोड आस्वाद घेत .....मग विवाह बंधन न वाटता एक "रेशीमगाठ "वाटेल ...कधीही न सुटणारी  ....हळूवार हाताने तिला सोडवतानाही  मन पुन्हा गुंतत जाते अशीच काहीशी जाणीव देत असते ही रेशीमगाठ ....!!

व्यक्ती सापेक्षता ...

©मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!