Get it on Google Play
Download on the App Store

पुढच्या वर्षी लवकर या

"गणपती बाप्पा मोरया " म्हणत आपल्या आवडत्या गणरायाचे स्वागत झाले मोदक सजावट रोषणाई आरत्या याने सारं घर दुमदुमल आणि एक दिवस तुलाच आम्हाला निरोप दयावा लागेल असे वाटले ही नाही तो दिवस येऊन ठेपला पण खरं सांगू तुझी सवय झाली होती .. माहित असतं कि तू परत पुढच्या वर्षी येणार तरी पुढच्यावर्षी लवकर या म्हणताना मन गलबलत रे....!

तुझ्या स्वागतात एवढं मन  रममाण होतं कि तू नसतानाही तुझ्या त्या रिकाम्या मखराकडे लक्ष जातं आणि तुझं नसलेलं अस्तित्व चैत्यन्यरूपात जाणवत राहत अगदी कायमचं....

पण पुढच्यावर्षी परत येशील ना  तेव्हा अपूर्ण स्वप्नांना सत्यात आणूनच..शेतकऱ्यांना भरपूर सुकाळ अनुभवता येऊ देत सर्वांना सुफल संपूर्ण आयुष्य सुरक्षित वातावरण घेऊन ये.स्त्रियांना वासनेच्या हत्येच्या क्रूर पाशातून मुक्त कर. आशेचा किरण घेऊन ये बर का? खरंतर माणूस म्हणून यादी संपणारच नाही पण सर्वे संतु निरामया: सर्वांना सुखी कर..

सगळ्यांच्या डोळ्यातील पाणी बघतोयस ना.. तू बसलेल्या जागेवर हात नकळत जोडले जातात फुलांनी सजवलेले तुझं तबक आता केवळ उरल्यासुरल्या पाकळ्यांचे धनी झालंय जणू काही त्या पाकळ्या हि रडत असतील. निरांजनाची वात सर त्या क्षणांची वाट बघतेय.. तू विराजमान झालेल्या मखराचा ही कंठ दाटून आलाय बघ..

तू गेल्या ची पोकळी त्याला खायला उठतेय निर्जीव वस्तूत चैतन्य आणलेस तू मग आमचे काय? मी तर एक सजीव तुझ्या चरणावर लीन होऊन मार्गक्रमण करणारी मी एक.

पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देताना एकाही माणसाने आवंढा गिळला नसेल असा माणूस नाही!
पाण्यात तुला तिसऱ्यांदा सोडताना हातातून काहीतरी सुटत चालल्याची जाणीव होऊ लागते मी मी म्हणणाऱ्यांना तू आम्ही आम्हीत आणतोस आणि नकळत सर्वांना पाच-सहा दिवस होईना एकत्र बांधून ठेवतोस पण तुलाही घाई असते का रे? तुझ्या आईकडे परत जाण्याची म्हणूनच तू थोडा मुक्काम करून संपूर्ण वर्षभराचे चैतन्य पसरून जातोस का रे...

तुझी पोकळी जाणवेल आरत्या मंत्र पुष्पांजली चे सुर उदबत्ती चा सुगंध गोडधोडाची चमचमीत पक्वान्नांची
चव या सगळ्यातून तू नकळत  अ खंड मानवी शरीरातील चेतना तुझ्या अस्तित्वाने जागृत केलीस.. आता उरला तो केवळ आठवणींचा शिरपेच सगळ्यांना नकळत मान ठेवून आशीर्वाद रूपात नकळत देऊन गेलास..

पुढच्या वर्षी लवकर या म्हणत तुला निरोप देताना पावले जड झाली. मागे वळून बघताना भकास मन तुझ्या अस्तित्वाच्या खुणा शोधत पुढच्या वर्षी लवकर ये म्हणत
पुनरागमनायच च आश्वासन घेऊनच तुझी वाट बघतोय "आम्ही" फक्त "मी नाही..".!!

कारण हा आमचा बाप्पा हा आमच्याच घरी बसलेला बाप्पा अशा जाणीवा असू नयेत असे शेवटी बाप्पा एकच सगळ्यांच्याच मनात त्याचे स्थान अबाधित भावना तीच.. तू हे जाणतोस च ना बाप्पा म्हणून आम्ही सारे...

या करोनाच्या सावटातून सगळ्यांची मुक्तता करून खऱ्या अर्थाने
"सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
हे...
सत्यात उतरावे हीच प्रार्थना करत तुला निरोप..
पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आश्वासन घेत.

!गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या..!

©मधुरा धायगुडे
अनंत चतुर्दशी
19सप्टेंबर 2021

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!