Get it on Google Play
Download on the App Store

मी मंदिरात नाही

मी तुमच्या तच....!
जेंव्हा भक्ती अन्नात शिरते
ती प्रसाद होते
जेंव्हा ती भुकेत शिरते
तिला उपवास जेंव्हा ती पाण्यात शिरते
तिला तीर्थ होते
जेंव्हा भक्ती संगीतात शिरते
तिला भजन,कीर्तन स्वरुपात दृकश्राव्य होते तर
जेंव्हा ती लोकसंगीतात शिरते
तिला भारुड म्हणून समोर येते तीच भक्ती
जेंव्हा  घरात शिरते
तेंव्हा घर मंदिर बनते अन्
जेंव्हा भक्ती कृतीत उतरते
ती सेवा होते तर
जेंव्हा भक्ती मानवात शिरते
तेंव्हा माणुसकी होते ......
त्या  भक्तीचे दर्शन केवळ मंदिरातच  असेल???
देव स्वतः च म्हणेल.....!
अहो  मी  मंदिरात नाही .........!

तुम्हाला मला नैवेद्य द्यायचा असेल तर जरूर द्या, पण मंदिरात नाही, एखाद्या भुकेल्याला पोट भरून खाऊ घाला, मी तिथेच असेन तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. कारण मी मंदिरात नाही ......             
तुम्हाला माझी सेवा करायची असेल तर जरूर करा,  मी आहे रस्त्यावर बसलेल्या रोग्यांमध्ये, मी तुम्हाला तिथेच भेटेन, कारण मी मंदिरात नाही....!

मला कुठलेही वस्त्र देऊ नका, त्या वस्त्राचा वापर एखाद्या गरजूंना द्या, मी तिथेच भेटेन, कारण मी कुठल्याही मंदिरात नाही......!

दिव्यांचा झगमट नक्कीच करा, पण मंदिरात नाही, मी आहे अंधःकारात जगत असलेल्या माझ्या अंध मुलांमध्ये त्यांच्या आयुष्याला प्रकाश द्या  या महामारीत सापडलेल्यांना प्रकाशाची वाट दाखवण्यास शक्य असेल तर मदत करा  मी आहे तिथे तुम्हाला आशिर्वाद द्यायला. कारण मी मंदिरात नाही,...
या मला भेटायला नक्की, पण पानं फुल घेऊन नको, मुक्या प्राण्यांची सेवा करा पशु पक्षांना पाणी दाणे द्या झाडं लावून संगोपन करा या वसुंधरेच्या जलचक्रास मदत करा ...निसर्गाचा संहार रोखा .निसर्गावर प्रेम करा .जनावरांना  चारा द्या , तेव्हा माझे दर्शन होईल तुम्हाला.  कारण मी मंदिरात नाही......
मला नमस्कार करायचा असेल तर नक्की करा, मी आहे तुमच्या कुटुंबातल्या वरिष्ठांमध्ये, त्या आई वडिलांना नमस्कार करा.शिक्षक समाजातील ज्येष्ठांच्या भावनांचा आदर करा त्यांना वंदन करा  मी तिथेच भेटेन तुम्हाला. कारण मी मंदिरात नसतोच. कधीही,........ !!!

भक्तीचे  मनातील  प्रकटीकरणाचे माध्यम मंदिरे असली  ती खरी भक्ती श्रद्धा मनातच असते ... मानवी शरीर  एक मंदिरच आतील आत्मा परमेश्वर कुणाचा..आत्मा दुखावला जाणार नाही याची काळजी घेणं ही त्या परमेश्वराची पूजा...जी माणुसकी शिवाय अपूर्णच.....म्हणून देवच म्हणेल मी मंदिरात नाही तर मी तुमच्यातच आहे........मनाची कवाडं बंद करुन संवेदनशीलता विसरली जाते तेव्हा देऊळबंद पण तेच संवेदनशीलता भक्तीच्या माणुसकीच्या  मार्गाने व्यक्त झाली तर ....देव नक्कीच साक्षात सगुणरुपात  दिसेल ..!!!

व्यक्ती सापेक्षता ,....!

©मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!