Get it on Google Play
Download on the App Store

मनातला आत्माराम

थोडे नावडते वाटेलही वाचणा-यांना आदरच ...!!
तरीही मांडावेसे वाटले कसा होतो प्रवास आपला वाचनीय माहितीचा आधार घेत मांडण्याचा विचार आला..

आत्म्याचे  अस्तित्व खरंच आहे का??
=  जी माता  गरोदर असते, त्या मातेला सुद्धा, आपण गरोदर आहोत, हें दोन महिन्यांनी कळते,
याचा अर्थ तो सूक्ष्म जीव

कसा प्रवेश करतो कसा संघर्ष करतो?

दोन महिन्यांनी त्या मातेला कळते कि आपण आई होणार आहोत  मग त्या आधी का नाही कळले?? कारण कि तो आत्मा संघर्ष करत असतो, जेव्हा एक संपूर्ण चेहरा तयार होतो,
आणि दोन हात तयार होतात, तेव्हा तो आईच्या गर्भात दोन्ही हात जोडून, प्रार्थना करतो, आणि बोलतो कि, सोडविशी येथूनी, तर मी स्वहीत करिन, स्वहीत म्हणजे, परमार्थ करिन,  हें वचन तो ईश्वराला देतो, आणि पण जसा मोठा होतो, तसे ईश्वराला दिलेलं वचन विसरतो,

अवकाशात फक्त ब्रह्मांड आहे, आणि पृथ्वी म्हणजेचं स्वर्ग च आहे.म्हणून तर आपण या भूतलावर अवतरलो.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरीत, शुक्राणूची माहिती दिली आहे, आठशे वर्षापूर्वी हें लिखाण केले आहे,  गरुड पुरणातही हे स्पष्ट व स्वच्छ लिहले आहे.आपण गरुड पुराण अनेकवेळा वाचले आहे .मग त्या काळात तर सोनोग्राफी नव्हती मग हें गूढ ज्ञान संत ज्ञानेश्वर यांना कुठून प्राप्त झाले,??
असाही प्रश्न पडतो.

आत्म्याचे अस्तित्व खरेच आहे का?  

मनुष्य देहाची पुण्याई असे पर्यंतच जिवंत राहतो, पुण्याई संपली कि देह ठेवावा लागतो,  आपल्याला दिसतो तो फक्त देह शरीर...

मग तो शरीरातील सूक्ष्म आत्मा आपल्याला का दिसतं नाही,??

आत्मा येताना त्या गर्भवती मातेला ही दिसत नाही  आणि जेव्हा मनुष्य देह सोडतो तेव्हाही दिसतं नाही, पण जेव्हा शरीरातुन आत्मा बाहेर निघतो, तेव्हा एक तर तो दुःखी असतो किंवा तो तृप्त झालेला असतो, जर तो अंतरात्मा दुःखी असेल, तर त्या शरीराला लाथ मारतो, आणि बोलतो, स्वहीत करिन असे बोलला होतास, पण या पृथ्वीवर जन्माला येऊन, मनुष्य देहाचे सार्थक, करू  शकलास नाहीस

संपूर्ण आयुष्य केवळ देह सुख पाहिलेस,
या कलियुगात संतांची ओळख करून घेऊ शकला नाहीस, आता मला पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा मारावा लागणार  असे बोलून तो अंतरिचा आत्माराम पुढील प्रवासाला निघतो,
आता ज्या व्यक्तीने प्राण सोडले आहेत, ती व्यक्ती, कुठे अडकली, जसे कि लोभात, किंवा काही खाण्याची इच्छा, अपूर्ण वासना राहिली, तर पुन्हापुन्हा त्या आत्म्यास जन्म घ्यावा लागतो, अश्या कित्येक परमार्थिक व्यक्ती आहेत, जे उपासना करुन, घरात सगळ्यांना सांगून गेलेत, कि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा  म्हणून मरणाचे स्मरण असावे शरीराचे  सार्थक करावे, पूर्वजास उद्धरावे हरी भक्ती करुनी

गुरूचरित्र ग्रंथात दुसऱ्या अध्याय मध्ये, कलिकाळ हा ब्रम्ह देवा समोर, उभा आहे, आणि त्याने शपथ घेतली आहे कि, मी पृथ्वीवर  परमार्थ करुन देणार नाही, जीभ, आणि वासना हेच माझं शस्त्र राहील, तेव्हा ब्रह्म त्याला बोलतात, कि जे संतांना शरण जातील, जे परमार्थ करतील, त्यांना तू बाधा करू नकोस, कली ही अट मान्य करतो, आज आपण पाहतो कि मनुष्य हा केवळ, देहाचे भोग घेत आहे, त्याचा स्वतः वर ताबा नाही, भान हरपत चाललाय तेच सत्य आता अनुभवायला मिळत आहे,

प्रत्येक मनुष्याकडे आठ विषय आहेत,
लोभ ,  क्रोध,   वासना  मद
मत्सर  चिंता  भावना  संशय

हें आठ विषयी मनुष्याचे मन, आणि अंतरात्मा भरलेला आहे. हें आठही विषय कोणत्याही शाळेत शिकवले जात नाहीत, ते दिसतं देखील नाहीत, पण मनुष्य त्यांचा अनुभव घेत असतो,

मग अंतरात्माची ओळख कशी घ्यायची,??

ज्याला परमार्थाची प्राप्ती झाली आहे, जो लोभात, आणि वासनेत न अडकता, केवळ परमार्थ करत आहे, त्यालाच अंतरीच्या आत्मारामाची ओळख होते कारण कि अंतिम समय जेव्हा येतो, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव होते, कि आपले या इहलोकांतील कार्य संपले आहे

मी जे वचन आईच्या गर्भात दिले होते, त्याच सार्थक झाले आहे, आता मला जिवंत पणीच मोक्ष प्राप्ती व्हावी जेव्हा तो असे नामस्मरण करत अंतरी संवाद साधत असतो,
तेव्हा, परेतून आवाज येतो, आता तुझी जाण्याची वेळ आली आहे, सगळ्यांना निरोप दे, उपासना करुन, पूजा करुन, मनुष्य देह सोडतो, काही जण अंतिम समयी नामस्मरण करताना, देह त्याग करुन गेलेत
मनातल्या आत्मारामाची ओळख करुन घेत घेत
आपण काय करायचे, ते प्रत्येकाने ठरवायचे!!!!!

©मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!