Get it on Google Play
Download on the App Store

कपभर चहा.....!!!

सकाळी सकाळी उठल्या उठल्या
याच्या शिवाय पर्याय नाही
पेपर वाचत दोन घोट घेता घेता
स्वर्ग दुसरीकडे कुठेच नाही

थंडीची दुलई पांघरुन सारा आसमंत धुक्याने दाटलेला असतो तेव्हा गरम गरम वाफाळणारा चहा  हवाहवासा वाटतो.चहा हे श्रीमंती पेय असाच उल्लेख करावासा वाटेल ..मग अशा थंडगार वातावरणात गरमागरम चहाची लज्जत कुठल्याही पेया पेक्षा अवीट लागते .गरमा गरम चहाचा एक घोट घेतल्यावर वा!! क्या चहा है ! असे शब्द नकळत बाहेर पडले नाहीत तरच नवल ...!! अगदी काही नाही तरी  घरी आलेल्याचा पाहुणचार कपभर चहा दिल्याशिवाय अपूर्णच...!!

चहासाठी कोणतीही निश्वित वेळ नाही. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री आणि अगदी पहाटेसुद्धा चहा प्याला जातो पण ते म्हणतात ना ...."चहाची कोणतीही वेळ नसते पण वेळेला चहाच हवा."
प्रत्येक पेयही आपापले स्थान त्या त्या ऋतुनुसार सिद्ध करतेच तसा गरमा गरम चहा ....!!!

चहा अगदी छोट्या बाळाला गरम आहे या शब्दाची ओळख करुन देताना आपण म्हणतो ..हाss आहे तर ..हसतानाचे  आपले हाssहाच होते ..तर असा हाsss चहातलाही .असाच चवीची दाहकता शब्दातून व्यक्त होते म्हणून चहा .!!अगदी राजापासून रंकापर्यत कुणालाही सहज परवडणारा चवीची लज्जत वाढवतो .मनाला तरतरी आणतो.

एकेकाळी चहावर 'श्रीमंती पेय' असा शिक्का बसला होता. अशा या श्रीमंती पेयाचा शोधही एका सम्राटाने लावला होता. सम्राट शेन नुंग असं त्याचं नाव होतं. एकंदरीतच चहाचा मागील इतिहास सांगतो अगदी राजे रजवाड्यांचाही वरदहस्त लाभलेला असा हा चहा ....!!

सकाळच्या वाफाळत्या चहाशिवाय आपला दिवस सुरू होत नाही आणि दिवसभरही आपली गाडी चालू राहण्यासाठी चहाचं इंधन टाकतच राहावं लागतं. मरगळलेल्या मनाला तरतरी येण्यासाठी तर कधी औषध म्हणूनही याचा उपयोग. चहा आवडत नसेल असा विरळाच ...!! अनेक गप्पा गोष्टी गरमागरमी या चहाच्या  निमित्तानं रंगतात असा हा चहा कायम चर्चेत असतो. तर काही सतत चहा पिण कसं अपायकारक हे चहातील अपायकारक घटकांबद्दलची चर्चा करुन सातत्यानं सांगत असतात तरी चहा सोडणारे  फारच कमी ..अगदी भूकेच्या कुठल्याही क्षणी आपली गरज भागवणारा जोडीला एखादे बिस्कीट असेल तर फारृच छान ती वेळ कृतार्थ करतात . त्यामुळे चर्चा करणारे आणि न करणारे आकंठ चहात बुडालेले असतात. चहा हा असा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. कुठेही, कधीही चहा आपल्यासमोर हजर होत असल्यामुळे चहाचं तसं अप्रूप मनात नसतं.

पाऊस आणि थंडी यात दोन्हीत एक गोष्ट समान तो हवेतला गारवा जणू काही चहा हा त्या गारव्यच्या गळ्यातला ताईतच ...थंडगार गारव्यात मस्त पाणी उकळले कि त्यात चहाची ही पावडर वेलची किसलेलं आलं आता सध्या लवंग दालचिनी युक्त मसाला घालून एक उकळी आली कि त्यात दूध घालून गरमागरम चहा कपात ओतून घेवून  तोंडाला लावला कि वाह चहा !!क्या बात है असेच म्हणू ....मग तो अगदी टपरीवरचा इराणी हाँटेलातला किंवा मशीनचा किंवा अगदी चुलीवरचा गुळाचा हीअसू देत चहा कुणालाही कधीही आवडतोच....त्यामुळे अगदी गल्लोंगल्ली अमृततुल्य दिसतात

पण एक काळ असा होता की, चहाच्या मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण व्यस्त असल्यामुळे चहाचा तुटवडा होता आणि त्यामुळे चहा चक्क लिलावानं विकला जात असे. याला 'मेणबत्ती लिलाव' असं म्हटलं जात असे म्हणजे पेटवलेली मेणबत्ती एक इंच जळेपर्यंत लिलावाच्या बोली घेतल्या जात असत. त्यामुळे चहाच्या किमतीतही खूप तफावत असे. आसे ऐकिवात आहे.आज चहा हे सर्वसामान्यांचं पेय झालयं  एका चहाच्या कपावर अगदी आयुष्य ही काढणारे दिसत.

जशी आपण चहाचा आनंद घेत आपल्या दिवसाची सुरुवात तसाच तो इतर ही देशात प्रिय पेय आहे.आपल्याकडे जसा दूध आणि साखरेचा चहा, ब्रिटनमध्ये हाय टी, चीनमध्ये ग्रीन टी, जपानमध्ये माचा टी  तसेच इतर काही देशांत चहाचे वेगवेगळे प्रकार लोकप्रिय आहेत. थोडक्यात काय चहा जगभरात पिला जातो याच्यात ही विविधतेत एकता बघायला मिळते प्रकार वेगळे तरी अनुभुति एकच असा हा चहा ....!!!

ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर चहाचा शनी ग्रहाशी संबध असावा  ज्या लोकांच्या कुंडलीत शनि कमकुवत आहे त्यांनी चहा जास्त प्रमाणात पिऊ नये. त्यापेक्षा अशा लोकांनी इतरांना चहा द्यावा. असे केल्याने शनीचे दुष्परिणाम कमी होतात. याउलट ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत शनि मजबूत आहे, त्यांनी चहा नक्कीच सेवन करावा असेच म्हणता येईल  

चहा फक्त चवीचा गोडवा जपत नात्यांची जवळीक ही जपतो एखाद्या हळुवार क्षणी टिपलेलं नातं चहाच्या साक्षीन बहरत जाते. तर कधी शब्दांच्या तोफा डागत मनातली भडास गरमागरम चहा चे उदाहरण देवून काढली जाते ...चहा चवीने जाणीवेने स्पर्शाने ही गरमच तरच भावतो तसचं काहीसं एकमेकांविषयीचा दडलेला जिव्हाळा जिव्हारी लागणाऱ्या शब्दाने अपूर्ण च....!!

असा हा चहा वाह!! क्या बात है!! या एकाच उद्गाराने त्याचे  वैशिष्ट्य रंग वास चव स्पर्श या सगळ्या गुणांनी भरलेला पंच ज्ञानेंद्रियांना समान न्याय देणारा वाफाळणारा चहा  आणि सोबत तशीच काहीशी चटपटीत गरम भजी हे गणित काही औरच ..!! असा हा चहा  ...मनाची मरगळ घालून तरतरी देणारा अनेकांचा सखा सोबती .....चहा वा ! क्या बात है !!!

सहजच सुचलेल...अशाच कपभर चहाच्या साक्षीने ..बघितल्यावर अरे बापरे वाटणारा पण संपल्यावर अरे संपला कि ...अशी काहीशी अवस्था होवून जाते असा हा कपभर चहा हवाच.. .!!!

© मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!