Get it on Google Play
Download on the App Store

‘ती’चे आयुष्य जगताना

'ती' चा प्रवास आधुनिक काळातील बदलती स्त्री या संकल्पनेनुसार बदलत जाणा-या 'स्त्री' विषयक जाणिवा यांचा विचार करताना स्त्रीवादविषयक मते मांडताना आधुनिक वाचनीय संदर्भही बदलण्याची गरज जाणवू लागली आहे का? असा विचार आला. खरंतर स्त्री सलज्ज, शालीन दाखवणा-या तसेच तिची बंडखोरी दाखवणा-या रुजवणा-या अनेक गोष्टींमध्येही कसे बदल होत गेले या आधुनिक कालखंडात हेही विचाराधीन.

'मिस वल्र्ड' 'मिस युनिव्हर्स' पर्यंत मजल गाठणा-या आपल्या भारतीय महिलांना पेलताना, मोबाईल, केबलक्रांती यांचाही फार महत्त्वाचा वाटा आहे. स्त्रीला अतिबाळबोध समजण्यापलीकडे स्त्री जाणिवांच्या कक्षा रुंदावत जातात आणि एकविसाव्या शतकातील 'स्त्री' नकळत बंडखोर बोल्डतेकडे वळताना दिसेलही, पण मूळ स्त्री सुलभ शालिनता टिकवून ठेवणारीच! म्हणूनच तिला 'स्त्री' म्हणावी लागेल.

स्त्री दु:ख, पारंपरिक मते, लग्न ते घटस्फोट या विचारभेदांचा विचार करताना नकळत ही 'स्त्री' स्वत:ला सिद्ध करू पाहते आहे. एका वेगळ्या जगण्याच्या व्याख्या संदर्भ देऊन जातात आणि हे संदर्भ बदलणा-या आपल्या स्त्री जाणिवा जपणा-या, स्त्रीला तिचे स्थान काय आहे, हे दाखवणा-या सावित्रीबाई फुले, आनंदीबाई, रमाबाई रानडे यांनीच स्त्रीला खरे तर चूल आणि मूल यातून बाहेर काढले असेच म्हणावे लागेल.

इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील यांच्यामुळे नेतृत्वाची धुरा स्त्रीला मिळाली. राजकारणाची बंडखोरी वृत्ती ही तिच्यात दिसू लागली. स्त्री देश चालवू लागली हे बदल स्त्रीमध्ये सकारात्मकता आणू लागले. म्हणूनच तिला 'स्त्री शक्ती' म्हणावी लागेल.

अंगमेहनतीचे काम करणा-या बांधकाम क्षेत्रामध्ये ग्रामीण महिलांनादेखील कमी समजून चालणार नाही. कौटुंबिक व सामाजिक जबाबदा-या पेलणा-या स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी तीही एक रणरागिणीच अशा अनेक उदाहरणांवरून स्त्रीचे स्थान नक्कीच सिद्ध होते.

मग आधुनिकतेमध्ये स्त्री-पुरुष समानतेकडे झुकणारा आजचा विचारप्रवास 'स्त्रीवाद' अनेक कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येऊ लागतो याचाही विचार आला. शेवटी हा स्त्रीवाद एक स्वप्न न ठरता सत्यात उतरला, तो हा स्त्री संकल्पना बदलणारा कालखंड. स्त्रीला प्रतिष्ठा देणारा आणि नकळत पुरुषाचा पुरुषार्थ टिकवणारा नवा कालखंड स्त्री जाणिवा अजून व्यापक करतो. मग खरंच आजची स्त्री स्वतंत्र आहे का? हा प्रश्नही थोडा विचार करायला लावेल, पण 'सातच्या आत घरात' ही उक्ती कुठेतरी मागे पडत चालली आहे. स्त्रीच्या बाबतीत झेपावणा-या पंखाबरोबर कवेत घेणा-या मोकळ्या आकाशाकडे झेपावताना एक लक्षात ठेवले की, आकाशाला क्षितिज नसते तर स्त्री स्वातंत्र्य सद्गुण ठरेल. तिला 'अशक्य' हा शब्दच माहीत नसेल, अशा झेपावणा-या स्त्री पंखांना सशक्त बळ देणारी, स्वत:ला घडवणारी स्त्री म्हणूनच तिला 'स्त्री' म्हणावी लागेल.

आपले स्वत:चे घरटे सोडून दुस-यांच्या अंगणात आनंद पसरवणा-या 'मी'ला 'आपले' करणारी अर्धागिनी, गृहलक्ष्मी, सगळ्यांची आशा, सरस्वती, लक्ष्मी, दुर्गेचं रूप 'स्त्री' आयुष्याच्या प्रत्येक रस्त्यावर आपल्या जबाबदा-या पेलवणारी तरीही न डगमगणारी स्वत:ला ताकदीने सिद्ध करणारी स्त्री आपला जगण्याचा व जगवण्याचा प्रवास असाच करत राहील. कारण, ती 'स्त्री' एक शक्ती, अनादी कालापर्यंत तळपणारी एक जागृत स्त्री. मग स्त्री कालची, आजची, बदलती स्त्री आधुनिक स्त्री असे न म्हणता उत्पत्ती-स्थिती-लय यांचा विचार करता 'स्त्री' ही स्त्रीच आहे. एक प्रकृती, फक्त बदलल्या विचारधारांनुसार तिचे जगण्याचे मापदंड बदलत गेले अन् 'ती' कालची, आजची अशी बिरुदे आपण मांडू लागलो.

'स्त्री' हे भूषण आहे, सर्व नकारात्मक विचारांना सामावून घेणारे म्हणूनच कदाचित तिचे सामर्थ्य पुरुषांपेक्षा काकणभर जास्तच आहे. अशी दूरदृष्टी ठेवणारी आपल्या कौटुंबिक जबाबदा-या सांभाळताना सामाजिक भान जपणारी, मृदुलता 'स्त्री' एक सखीच म्हणून जास्त भावणारी एक जाणीव, हीच खरी भावना, हाच खरा सन्मान!

© मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!