Get it on Google Play
Download on the App Store

विस्कळित कुटुंब ...भाग 2..!

विस्कळित कुटुंबाची कारणे बघताना  अजून काही वैशिष्टये पडताळून बघता येतील का असा विचार येवून मी पुन्हा आज त्याच विषयाकडे वळले बघा विचार करुन...

विस्कळीत कुटुंबामध्ये मोठे झाला आहात का ??

तपासून पाहू शकता...

१. तुम्ही लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता
जर लोकांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असाल तर ते तुम्ही विस्कळीत कुटुंबातील आहेत ह्याचे लक्षण आहे. जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजांचा त्याग करून दुसऱ्यांना आनंदी ठेवत असाल तर ते ह्याच लक्षण आहे.

२. 
जर तुम्ही कायम प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण राहण्याचा प्रयत्न करीत असाल तर, तुम्हाला अपयशाचे भय वाटते. हे तुम्ही विस्कळीत कुटुंबात वाढत असल्याचे लक्षण आहे.

३. आपण सतत स्वतःला दोषी मानता का?
जर तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या वागणुकीमुळे, जे की तुमच्या अधिपत्याखाली नाही त्याला दोषी मानता का? लोक तुमच्यामुळे दुःखी झाले नसले तरीही तुम्ही स्वतःला दोषी समजता का?

४. तुमच्याकडे संवादकौशल्य कमी पडतात का?
जर तुमच्याकडे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत भावना व्यक्त करण्याचे निरोगी कौशल्य नसेल तर तुम्ही शांत बसता आणि व्यक्त होत नाही. तर तुम्ही विस्कळीत कुंटुबातील असण्याची शक्यता जास्त आहे.

५. दुसऱ्यांसाठी स्वतःला जबाबदार धरता
दुसऱ्यांनी स्वतः घेतलेल्या निर्णयामुळे बिकट परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही स्वतःला जबाबदार धरणारे आहात 

६. स्वतःच्या बाबतीत तुम्ही खूप कठोर आहात
तुम्ही स्वतः कुठलीही छोटी गोष्ट केली किंवा मोठं यश मिळवलं तरी तुम्ही स्वतःवर तीव्र टीका करता. काहीही चुकीचं झालं तरी तुम्ही तो स्वतःचा दोष धरता. तुम्ही स्वतःबाबत खूप कठोर होता.

७. तुम्ही खूप चिंता करता
जरी सगळं सुरळीत चालू असेल तरी तुम्ही सतत चिंता करत राहता. त्यामुळे चिंता खूप वाढते. परिणामी तुम्ही स्वतः आनंदी राहू शकत नाही.

८. तुम्हाला एकटं आणि रिकामं वाटतं
सारखं एकटं राहिल्याने आणि भावनिक आधार न मिळाल्यामुळे तुम्हाला अपूर्ण आणि रिकामे वाटते. तुम्हाला सतत तुमच्याकडे लक्ष असावे असे वाटते आणि मग तुम्हाला एकटं वाटतं.

९. निराश वाटणे
आयुष्य कसंही असलं तरी तुम्ही काय चुकत आहे हे सांगू शकता आणि तुम्ही असमाधानी राहता. तुम्हाला असे वाटत राहतं की तुम्हाला यश मिळत नाही.

१०. तुम्हाला मत्सर वाटू शकतो
तुमच्या दैनंदिन आयुष्यात काहीही कारण नसताना तुम्हाला दुःखी आणि निराशावादी वाटू शकते. त्यामुळे तुमच्यात नकारात्मक विचार असतील तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा.

**विस्कळीत कुटुंबाचे गुणधर्म कसे ओळखाल का होतात कुटुंबे विस्कळित...

विस्कळीत कुटुंबातील  कुटुंबातील सदस्य एकमेकांशी अनोळखी असल्याप्रमाणे वागतात. तसेच त्यांची एकमेकांप्रती वृत्ती सुद्धा तशीच असते .

•  संवादाचा अभाव....
विस्कळीत कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी मोकळा संवाद कसा साधावा हे कळत नाही आणि तसेच अशा कुटुंबांमध्ये संवादाविषयी प्रश्न सुद्धा असू शकतात. काही प्रश्न असतील तर मोकळेपणाने चर्चा न करता ते दडपून ठेवले जातात. ते संवादासाठी सुदृढ वातावरण तयार करू शकत नाहीत. संवाद साधताना एकमेकांवर आरडाओरडा आणि भांडणे होतात. कुटुंबातील सदस्य एकमेकांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात.

*सहानुभूतीचा अभाव
विस्कळीत कुटुंबामध्ये सहानुभूती नसते किंवा कमी प्रमाणात असते. ह्याचे प्रमाण इतके जास्त असते की स्वतःविषयी वाईट वाटते.  प्रेमाचा अभाव असतो. 

*वागणूकीवर बंधन
काहीवेळा घरातील सदस्य प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे त्यांची विकासाची विचाराची क्षमता कमी होते. अशा नियंत्रणामुळे स्वतःबद्दल साशंक होतात आणि स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण होते.

*टीका तुलना ही ही कारणे मानसिक विकास खुटंवतात 

*. भावनिक आधाराची कमतरता
विस्कळीत कुटुंबामध्ये भावनांचा विचार केला जात नाही किंवा भावनिक आधार दिला जात नाही. सदस्यांना मोकळेपणाने बोलता येत नाही तसेच त्यांचे म्हणणे

*सकारात्मकतेने ऐकेल असा कुणीही नसते. 
जेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्ही अविकसित कुटुंबात वाढलेले आहात, तेव्हा सर्वात आधी ते स्वीकार आणि त्यासंबंधित काही सवयी किंवा वर्तणूक असेल तर ती मान्य करा. तुम्ही अविकसित कुटुंबात वाढलेले असल्याने त्याचे परिणाम सुद्धा तुमच्यावर होतात. 
*पण ह्यातून सकारात्मकतेने बाहेर पडा .

* जबाबदारी घ्या
एक प्रौढ ह्या नात्याने तुम्हाला तुमच्या परिस्थितीवर मात करून, भावनिकरीत्या सुदृढ परिस्थिती कशी निर्माण होईल ह्यावर काम केले पाहिजे. स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे तसेच तुमच्या स्वतःच्या स्वतःकडून आणि कुटुंबाकडून काय अपेक्षा आहेत हे शिकले पाहिजे.

*मदत घ्या
जेव्हा कमतरता तुमच्या लक्षात येतात, तेव्हा तुम्ही तज्ञांची मदत घेतली पाहिजे. आणि लहानपणाचे काही प्रश्न कसे हाताळावेत ह्याचीसुद्धा मदत घेतली पाहिजे. स्वप्रशंसा हाताळणे खरं तर अवघड आहे परंतु मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाची मदत नक्कीच घेऊ शकता.

*सर्जनशील व्हा
तुम्हाला विस्कळीत कुटुंबामुळे आलेला नकारात्मक परिणाम घालवायचा असेल योग्य मार्गाने तुमच्या कुटुंबातील सदस्यांजवळ आणि जवळच्या मित्र मैत्रिणींजवळ व्यक्त व्हा. विचारांची देवाणघेवाण करा आणि तुमचं नातं कसं वाचवता येईल ते पहा.

*विश्वास संपादन करा
जिथे विश्वास नाही अशा वातावरणात राहणे हे सोपे नाही. तुम्ही लहान असताना अविश्वासपात्र पालकांना पाहिल्यामुळे तुमच्या प्रौढावस्थेत तुम्हालाही तशीच सवय लागते. थोडं धैर्य आणि प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या जवळच्यांमध्ये विश्वास संपादन करू शकता.

*तुमच्या कुटुंबात बंध निर्माण करा
ज्या विस्कळीत कुटुंबामध्ये भावनिक अस्थिरता असते तिथे तुम्ही हे तुटलेले नातेसंबंध नव्याने जुळवू शकता. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. माफ करायला शिका आणि तुमच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करा. तुम्ही लहानाचे मोठे कसेही झाला असलात तरीही तुम्हाला स्वतःला सुधारण्याची नेहमीच संधी असते त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्यांशी नक्कीच अर्थपूर्ण नातं निर्माण करता येईल.

विस्कळित कुटुंबातून असूनही सकारात्मक विचारसरणी यावर मात करायला शिकवते पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणत आपल्या अनुभवातून इतरांना साथ देवून उभे करण्यास मदत करा ...अशा अपयशाचाही सामना करायला शिका समस्यांपेक्षामोठं होत हाच धडा...!!

©मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!