Get it on Google Play
Download on the App Store

खंजीर...

साक्षर झाला माणूस म्हणे
धडे अभ्यासाचे गिरवून गेले,
जातीपेक्षा थोर माणूसकी 
दुरूनच ते पेरून गेले...

गौतमासम शांती असावी
अनुयायी बोलून गेले,
संविधान बाळगून जवळी
हक्क आपले बजावून गेले...

अंधार आजही कायम आहे
कित्येक काळ संपून गेले,
गेले का जोडून आपसात
जातीय दंगलीत भांडलेले...

शिकवणारे शिकवितांना
अज्ञान माघे ठेवून गेले,
टेम्भा मिरवून मानवतेचा
जातीय विष कालवून गेले...

फुले आंबेडकर शिवबा त्यात
पोस्टर वरती एक झाले,
साक्षर झाला माणूस म्हणे
खंजीर माघे ठेवून गेले...

संजय सावळे