Get it on Google Play
Download on the App Store

कातरवेळ..

Sanjay Sawale
    
Thu, Apr 29, 2:36 PM (1 day ago)
    
to authors
   
Translate message
Turn off for: Marathi
Please publish my content in bookstruck.app. Enter your content below.

कातरवेळ..

लहानपणी चाळीमध्ये
सोबत आपण राहायचो,
मन अगदी चुर व्हायचं
जेव्हा चोरून मी पाहायचो..

लग्नातल्या पंगतीत
बसलेली तू असायची,
वाढण्यासाठी आमची
चढा-ओढ असायची...

तू जेवली की सारं
गाव जेवल्या सारखं वाटायचं,
लहानपणीचं बव्हल्यावर
चढल्या सारखं वाटायचं..

तेव्हाही तुझे डोळे
पाणीदार असायचे,
नवरीवाणी मंडपातल्या
खूप-खूप लाजायचे..

लग्नातल्या अक्षदा
फेकून खूप मारायची,
लटक्या रागानही
डोळे भरून पाहायची...

दिवस बघ कसे
भराभर संपून गेले,
कातर वेळी आसवं
डोळ्यातून निघून गेले..

संजय सावळे