शिवबा....
सह्याद्रीच्या कड्या कपारीतून
आवाज एक गर्जून गेला,
शिवबा सारखा सूर्य येथे
चराचरातून तळपुन गेला...
अश्वावरती आरूढ होऊनी
खडग शोभती म्यानाला,
जमवून सवंगडी,मावळा
त्यास नाव देऊन गेला...
मुघलांची सत्ता अफाट
छातीवरती झेलत गेला,
किल्यामागुन जिंकून किल्ले
तोरण स्वराज्याचे बांधून गेला...
धन्य धन्य झाली कूस
देऊन जन्म शिवबाला,
सह्याद्रीच्या छातीवरती
छावा एक लढून गेला...
संजय सावळे