अस्तित्व....
एकटा असतांना कधी
भय मृत्यूचं भासलं नाही,
दुःख सारी बघून झाली
आसवं आता मिळणार नाही...
मी उगीच काळजीत असतो
उद्याच्या,जो काळ माझा नाही,
सुकणार होतं फुल म्हणून
मोहरणं कधी थांबलं नाही...
सूर्य रोज उगवणार होता
कुणासाठी थांबणार नाही,
मी आसवं घेऊन उभा होतो
बाजारात त्याला मोल नाही..
मी बघितलंय येथे कालपर्यंत
कुणी मनसोक्त जगला नाही,
सफेद पत्रिकेचा शोकसंदेश
वाचायला मिळणार नाही...
तारीख पाहून कुणी
ती पत्रिका जपणार नाही,
बघा अस्तित्वाचा खेळ येथे
जळतांनाही संपणार नाही....
संजय सावळे