जात....
जन्मला तेव्हा काय जात कुणाची
नव्हता अंगभर कपडा कुणाला....
नव्हता कुठला कूळ कुणाचा
कुणीच नव्हतं ओळखत कुणाला...
नव्हती गावकुसाबाहेर वस्ती
नव्हता नशिबी वाडा कुणाला...
निर्मल होता तळ पाण्याचा
नव्हतं केलं गढूळ कुणाला...
सत्तेत मोठी झालीत काही
पेरून गेली जात क्षणाला...
पिवून रक्त गोचीड चिटकला
तशी चिटकली जात माणसाला...
आयुष्याची चुकवून फेरे
चुकल का मरण कुणाला...
सरणावरती जळतांना त्यानं
विचारली का जात कुणाला...
संजय सावळे