पाऊस...
पहिल्या पावसात तू
बिलगायला हवे होते,
कोसळणाऱ्या धारा सोबत
कोसळायला हवं होते...
पाऊलवाटेत खुणा
बनायला हवं होतं,
बासरीचा सूर बनून
कानात शिरायला हवं होतं...
राधा बनून मजसंगे
खेळायला हवं होतं,
स्वप्नात येऊन रात्री
जागवायला हवं होतं...
बघ आता बाहेर पुन्हा
पाऊस कोसळत आहे,
ढगांसारख्या आठवणी
मनात दाटत आहे ...
मलाही निमित्त हवं होतं
पाऊस होऊन कोसळण्याचं,
अन आठवणीत भिजण्याचं.....
संजय सावळे