लाज....
सजवून देह कोवळा
विकण्यास उशीर झाला..
नजरा सगळ्या शापित होत्या
त्या हेरण्याचा शाप दिला..
सभ्यतेची बसवून पुतळे
असभ्यतेने घात केला...
चुरगळुन गेलेत कळ्या
लाचार हा बाजार झाला...
काय म्हणावं त्या भाकरीला
भुकेनेच जेव्हा घात केला..
स्वीकारेल का समाज पुन्हा
सजलेल्या तिरडीला....
संजय सावळे