नवस
बंद दरवाज्या आडून
देवा काय चालू आहे,
तडफडत माणूस आता
नवसाला चालत आहे....
पूर्वी कोंबडे-बकरे कापुन
नवस तू फेडुन घ्यायचा,
तडफडतांना पाहून
काटा अंगावर यायचा...
गावाकडं माणूस
मोकळी हवा खायचा,
चार चौघात बसून
मन मोकळं करायचा...
रात दिवस शेतामंधी
राब राब राबायचा,
संध्याकाळी तुझ्यापुढं
संध्यावात जाळायचा....
सणासुदीत माणूस
आनंदात असायचा,
लग्नात मुलीच्या
कर्ज काढून नाचायचा...
तडफडनारी बघून
थरकाप उडतो मनाचा,
हतबल होऊन माणसानं
धरला रस्ता मसनाचा...
माणसानं कुना पुढं
पदर आता पसरायचा,
विसरून देवा सगळं आता
थांबव खेळ मरणाचा....
थांबव खेळ मरणाचा...
संजय सावळे