पहिलं प्रेम...
वर्गात एकदा आमच्या
नवीन मुलगी आली,
मीच काय पण
सगळी पोरं खुश झाली..
चोरून बघतांना
नजरा वर नजर व्हायची,
अभ्यासातली सारी
मज्जाच निघून जायची..
पावडर आता मीही
दोन टाईम लावू लागलो,
तिच्यासंग आपलं नावं
भिंतीवर लिहू लागलो...
मित्रही आता
मदतीला धावू लागले,
लव लेटर एखादं
देऊन पहा म्हणले...
माझं अक्षर कधी
मलाच कळलं नाही,
लव लेटर दिल्यावर
कधी पुन्हा भेटलो नाही..
असं माझं पाहिलं प्रेम
तिला कधी कळलं नाही,
पावसालाही गर्दीत
माझे अश्रू दिसले नाही...
संजय सावळे