पुन्हा भेटशील का आई..
घरट्या मध्ये पिला
जन्म देई आई,
फडफडणाऱ्या पंखांना
मायेची ऊब देई...
उन्ह असो वारा असो
नाही पाहिलं काई,
पिलांसाठी सारखी
राबली माझी आई....
हंबरलो तुझं साठी
गोठ्यातुन आई,
कधी धावुन आली
कळलं मला नाही....
विश्वात माझ्या मी
नव्हतो हरवलो आई,
बघ जरा काळीज माझं
धडधडतय तुझ्या पायी...
थकलो म्हणजे केसांतून
हात फिरवायची आई,
हातांमध्ये कुठून बळ
येतं तुझ्या आई...
जगणं आता पुरेसं
झालं वाटलं आई,
अश्रुंनाही बांध नाही,
आता फुटलं धरणं आई..
रडलो कधी पुसण्यास
पदर तुझा राही,
कुठं कुठं शोधू तुला
पुन्हा पुन्हा आई...
ग पुन्हा पुन्हा आई...
संजय सावळे