फितूर..
इतिहासाला देऊन मूठमाती
मराठा पुन्हा फितूर झाला..
रक्तात आमच्या वाहतो शिवाजी
बोलून तो मावळा गेला..
आठवतो का खरंच येथे
मराठा आपल्या बापाला...
स्वार्थासाठी कोल्ह्यांनी
जाळून टाकलं इतिहासाला....
जातीसाठी भांडून आपसात
माणूस येथे पोरका केला...
जाणतात सगळीच येथे
शिवाच्या भगव्या रंगाला...
भगवा आठवून आता
पेटवा मनात शिवबाला...
स्वराज्य पुन्हा येईल
माणूस म्हणून जगण्याला...
संजय सावळे