मैत्रीत..
बरसून गेल्या जलधारा
तप्त उन्हांनं छळलं आज...
कुठे डुबले आकाश सारे
खिन्न कसे सर्व आज...
जिवाभावाचा मित्र माझा
सोडून दूर गेला आज...
मैत्रीच्या बांधिलकीचे
कुपीत जपले वचने आज...
सहवासाची संथ वात
तेवतं होती मनात आज...
ऋणानुबंधाचे बंध तू
क्षणात मोकळे केलेस आज...
संजय सावळे