ऐशा आनंदात एक मासवरी । रा...
ऐशा आनंदात एक मासवरी । राहिली निर्धारी पंढरीये ॥१॥
नित्य जावोनियां चंद्रभागेस्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
क्षेत्र प्रदक्षिणा नामाच्या गजरी । येवोनी महाद्वारी हरि वंदी ॥३॥
सोयरा म्हणे ऐस सारोनियां नेम । वाचें गाय नाम विठोबाचें ॥४॥