Android app on Google Play

 

अहो पंढरीच्या राया । दंडा...

 

अहो पंढरीच्या राया । दंडावत तुमच्या पाया ॥१॥

तूंचि उदार त्रिभुवनीं । ऋध्दि सिध्दि तुझे चरणीं ॥२॥

भुक्तिमुक्तिचा तूं दाता । मी तों काय वानूं आता ॥३॥

बैसेन महाद्वारी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥