याचिये संगतीं अपायचि मोठा...
याचिये संगतीं अपायचि मोठा । दु:खाचा शेलवटा भागा आला ॥१॥
आतां पुरे हरि आतां पुरे हरि । सोडवी निर्धारी यांतोनियां ॥२॥
बहुतचि खंत करितसे मन । दाखवा चरण मजलागीं ॥३॥
गहिवर नावरे उदास अंतरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥