Android app on Google Play

 

बहुता परी वानितसें देवा ।...

 

बहुता परी वानितसें देवा । न कळे केशवा कांही मज ॥१॥

सेवा कैसी करूं काय ध्यान धरुं । न कळे साचार कांही मज ॥२॥

कैसी ती भाक्ति करावी देवा । न कळे कांही हेवा दुजा मज ॥३॥

तुमच्या उच्छिष्टाची आस निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥