Android app on Google Play

 

उदारा पंढरिराया नको अंत प...

 

उदारा पंढरिराया नको अंत पाहूं । कोठवरि मी पाहूं वाट तुझी ॥१॥

माय तूं माउली जिवींचा जिव्हाळा । पुरवावा लळा मायबाप ॥२॥

सर्वांपरी उणें दिसते कठिण । आता नका शीण माणी माझा ॥३॥

निवांतचि ठेवा तुमचिये दारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥