चोखा बैसतां समाधीसी । निर...
चोखा बैसतां समाधीसी । निर्मळा आली पंढरीसी ॥१॥
पाहोनी आनंदसोहळा । म्हणे विठ्ठला दयाळा ॥२॥
चोखा मेळविला रूपी । माझी आतां कोण गती ॥३॥
देव बैसोनी निकटी । निर्मळेसी सांगे गोष्टी ॥४॥
ऐसें देखोनियां नयनी । सोयरा मिठी घाली चरणीं ॥।५॥