देखोनी आंधळे कां बा जन हो...
देखोनी आंधळे कां बा जन होती । न कळे या गति मजलागी ॥१॥
एकातें मरतां आपणाचि देखती । तयासी रडाती आपणचि ॥२॥
हा कैसा नवलाव न कळे यांचा भाव । कोण घाव डाव आम्हांलागी ॥३॥
अवघेचि मज नवलाची परी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥