ऐसा आनंदसोहळा । निर्मळा प...
ऐसा आनंदसोहळा । निर्मळा पाहे आपुले डोळां ॥१॥
आनंद न माय गगनीं । वैष्णव नाचती रंगणीं ॥२॥
जेथें नाही भेदाभेद । अवघा भरला गोविंद ॥३॥
तया सुखाची सुखराशी । वोळली ती निर्मळेसी ॥४॥
सोयरा देखोनी आनंदती । वेळोवेळां विठु न्याहाळी ॥५॥