Android app on Google Play

 

स्वर्गारोहण पर्व

 

स्वर्गामध्ये युधिष्ठिरांना दुर्योधन मानाने सिंहासनावर बसलेला दिसला. आपले बंधू मात्र त्यांना तेथे दिसले नाहीत; द्रौपदीही दिसली नाही. त्यांना सखेदाश्चर्य वाटले.

जेथे हे सर्व आहेत, तेथेच मला न्या, असे ते म्हणू लागले. तेव्हा एका देवदूताने त्यांना नरकात नेले. नरकाचे दर्शन त्यांना असह्य झाले; पण तेथेच त्यांना आपले बंधू, पत्नी व आप्त भेटले. हे सर्व नरकात का? ह्यांनी पातक तरी काय केले ? असे प्रश्न युधिष्ठिरांना पडले.


त्यांनी ह्या सर्वांसह नरकातच रहावयाचे ठरविले. अखेरीस धर्मदेवाने युधिष्ठिरांना सांगितले, की तू जे पाहिलेस, ती भगवान इंद्राची माया होती. तुझ्या परोपकारबुद्धीची कसोटी त्यातून पाहिली गेली. तू तीत उत्तीर्ण झालास.

तुझे बंधू, द्रौपदी आदि सर्व स्वर्गातच आहेत. त्यानंतर युधिष्ठिराचा मानवी देह नाहीसा होऊन तो परमात्म्यात विलीन झाला.