Android app on Google Play

 

अनुशासन पर्व

 

अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र, शुभाशुभ कर्मविचार, दैव पुरूष विचार, अनेक वर्णांचे आणि आश्रमांचे धर्म, गोरक्षणाचे माहात्म्य, तारकासुर वृत्तांत, श्राद्यविधी अशा विविध संकीर्ण विषयांचे भीष्मांनी केलेले विवेचन या अनुशासन पर्वात आले आहे.

श्रोता व पृच्छक आहेत युधिष्ठिर म्हणजेच धर्मराज.


 उत्तरायण सुरू झाल्यावर भीष्मांनी योगसाधनेने देहत्याग केला.

त्यावेळी धृतराष्ट्र, युधिष्ठिरादिक पांडव व त्यांचे सर्व आप्तसुहृद उपस्थित होते. भीष्मांची अंत्येष्टी केल्यावर सगळे परतले.