Get it on Google Play
Download on the App Store

महाप्रस्थानिक पर्व

व्यासांच्या निरोपाप्रमाणे युधिष्ठिरांनी महाप्रस्थानाचा संकल्प केला.

अभिमन्यूपुत्र परिक्षित याला राज्याभिषेक केला. नंतर हस्तिनापूर सोडून उत्तरेस द्रौपदीसह सर्व पांडव महाप्रस्थानास निघाले.

हिमालय पर्वत पार केल्यावर त्यांना वाळूचा समुद्र लागला. मेरू पर्वताचे दर्शन झाले.

शक्ती क्षीण झाली. प्रथम द्रौपदी कोसळली आणि संपली. क्रमाने सगळे पडले आणि संपले. युधिष्ठिर तेवढे पुढे जाऊ शकले.

वाटेत रथस्थ इंद्राने त्यांचे स्वागत केले. इंद्र युधिष्ठिरांस स्वर्गात नेण्यासाठी आला होता.


आपले बंधू आणि पत्नी द्रौपदी ह्यांच्याशिवाय आपण स्वर्गात येणार नाही, असे युधिष्ठिरानी सांगितले. ते सर्व आधीच स्वर्गात पोहोचल्याचे इंद्राने त्यांना सांगितले.

युधिष्ठिरांबरोबर एक कुत्रा सारखा होता. त्याला स्वर्गात घेण्याचे इंद्राने नाकारले, तेव्हा धर्मराजांनी आपण स्वतःही त्या कुत्र्यावाचून स्वर्गात राहू शकत नाही, असे उत्तर दिले.

हे उत्तर दिल्याबरोबर तो कुत्रा जो प्रत्यक्ष धर्मदेवच होता तो प्रकट झाला. धर्मदेवाने युधिष्ठिरांची प्रशंसा केली. नंतर स्वर्गात जाण्यासाठी युधिष्ठिर इंद्राच्या रथात बसले.