आश्रमवासिक पर्व
करूवंशाचा प्रमुख या नात्याने धृतराष्ट्राचा युधिष्ठिरांकडून सर्व प्रकारे आदर केला जात होता. गांधारीचाही राज कुलात मान राखला जात होता.
पंधरा वर्षे राजमहालात राहिल्यानंतर धृतराष्ट्राने गांधारीसह वानप्रस्थ स्वीकारला. धृतराष्ट्र-गांधारी वनात गेले. कुंती, विदुर आणि संजयही त्यांच्यासह वनात गेले.
दोन वर्षांनंतर पांडवांना वार्ता आली की, धृतराष्ट्र,
गांधारी
आणि कुंती हे दावानलामध्ये भस्मसात झाले. संजय हिमालयात निघून गेला.