हे भरत लोक कोण होते ?
भरत या मानववंशाचे नाव ऋग्वेदा मध्ये अनेक
ठिकाणी येते. त्याच मावनवंशाच्या भारतजन असा उल्लेख ऋग्वेदात आला आहे. भरत या
संज्ञेचे अनेक प्राचीन सम्राट पुराणांमध्ये निर्दिष्ट केलेले आढळतात. त्यांपैकी
दुष्यंत-शकुंतला यांचा पुत्र भरत हा सम्राट होऊन त्याच्या वंशालाही भरत ही संज्ञा
होती. त्याच्याच वंशातील कौरव-पांडव हे होत. त्यांच्या युद्धाची कथा म्हणजे भारत
किंवा महाभारत होय. दुष्यंतपुत्र भरताच्या कुलात जन्मलेल्या कुरू राजाचे
हस्तिनापूर येथील वंशज म्हणजे कौरव आणि पांडव होत. या वीरांची जन्मापासून
अखेरपर्यंतची महाभारत ही कथा वीरगाथाच होय. ही वीरगाथा संबंध महाभारताचा गाभा होय.