Android app on Google Play

 

उपचार

 

भीष्मांवर उपचार करण्यासाठी शल्य चिकित्सकाला बोलावण्यात आले परंतु भीष्मांनी इलाज करून घेण्यास नकार दिला संपूर्ण परिवार त्यांना घेरून उभा होता. अशात त्यांनी पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली. सर्व योद्धे त्यांच्यासाठी पाणी आणायला धावले पण त्यांनी केवळ अर्जुनाकडे पाहिले. अर्जुनाने त्यांच्या भावना ओळखून एक बाण मारून पृथ्वीतून अमृत तुल्य जल काढू दिले. ते पिऊन झाल्यानंतर भीष्मांनी दुर्योधनाला युद्ध थांबवण्याचा आग्रह केला परंतु दुर्योधनाने त्यांचे ऐकले नाही आणि दुसऱ्या दिवशी कर्णाला सेनापती घोषित केले.