Android app on Google Play

 

भीष्मांचे जखमी होणे

 

दहाव्या दिवशी भीष्मांनी सांगितलेल्या रहस्याचे पालन करून पांडवांनी युद्धात भीष्मांच्या समोर शिखंडी उभा केला. भीष्म एका नपुंसकावर अस्त्र उचलू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी आपले शस्त्र खाली ठेवले. त्यानंतर अतिशय बेईमानीने अर्जुनाने भीष्मांचे शरीर बाणांनी भेदले. भीष्म बाणांच्या शय्येवर पडले. भीष्मांची अवस्था पाहून कौरव सैन्य भयभीत झाले. ते सर्व धावत भीष्मांच्या जवळ आले. भीष्म त्या म्हणाले की त्यांना आपले डोके ठेवण्यासाठी एक उशी पाहिजे आहे. अन्य राजांनी मखमली उशा आणल्या तर भीष्मांनी त्या स्वीकारल्या नाहीत. शेवटी त्यांनी अर्जुनाला सांगितले की एका योद्ध्याला साजेशी उशी मला दे. अर्जुनाने ३ बाणांच्या सहाय्याने त्यांचे मस्तक सांभाळणारा सहारा निर्माण करून दिला.