राजा प्रतीप
ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा देवी देवता पृथ्वीवर विहार करत असत. अशातच कुरु राजा प्रतीप गंगेच्या किनारी पुत्र प्रप्तीसात्रही तपश्चर्या करत होता. अशात गंगेची नजर त्याच्यावर पडली. त्याच्यावर मोहित होऊन गंगा त्याच्या उजव्या मांडीवर बसली. प्रतीपने जेव्हा डोळे उघडले आणि गंगेला असे करण्याचे कारण विचारले तेव्हा गंगेने सांगितले की तिला त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा आहे. त्यावर प्रतीप म्हणाला की ती त्याच्या उजव्या मंद्दीवर बसली आहे, त्यामुळे तो तिला पत्नीच्या स्वरुपात नव्हे तर पुत्र वधूच्या स्वरुपात स्वीकार करू शकतो. हे ऐकून गंगा तिथून निघून गेली. जेव्हा प्रतीप चा पुत्र शांतनू याचा जन्म झाला तेव्हा प्रतीपला गंगेशी विवाहाची गोष्ट आठवली.