Get it on Google Play
Download on the App Store

पित्याचे वरदान

देवव्रत जेव्हा सत्यवतीला राजा शांतनू कडे घेऊन गेला तेव्हा शंतनू राजाच्या प्रसंनातेला सीमा राहिल्या नाहीत. तो भीष्मांना म्हणाला की आज तू पितृ भक्तीचा नवीन आदर्श घालून दिला आहेस. मी तुला इच्छा मृत्यूचे वरदान देतो. एवढेच नव्हे तर त्याने देवव्रतला भीष्म असे नाव दिले आणि सांगितले की आजपासून तुझ्या या प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा म्हणून ख्याती लाभेल.